पुणे : पुण्यातील तळजाई वनशिव झोपडपट्टी परिसरात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तोंडावर रुमाल बांधून 6 जणांच्या टोळक्यांनी ३० वाहनांची तोडफोड केली. शनिवारी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. या वाहनांमध्ये टेंपो, रिक्षांसह अन्य वाहनांचा समावेश आहे. सहकारनगर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.