मंचर : स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार सिमेंटच्या खांबाला धडकली. या अपघातात कारचे नुकसान झाले. मात्र, कारमधील दोघांना फारशी इजा झाली नाही. हा अपघात रोडेवाडी- लाखनगाव रस्त्यावर घडला. बेल्हे – जेजुरी मार्गावर लाखनगाव रोडेवाडी फाटा येथे कारचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या महावितरणच्या खांबाला धडकली. त्यामुळे खांब खाली पडला. यात कारचे नुकसान झाले. कारमधील दोघेही सुखरूप असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. घटनेची माहिती कळताच महावितरणाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली.