पुणे

कवठे येमाई येथे कारचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

अमृता चौगुले

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील बसस्थानकाजवळ बुधवारी (दि. 31) सकाळी साडेसातच्या सुमारास बॅटरीवर चालणार्‍या महिंद्रा चारचाकी गाडीचा अपघात झाला. गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने आणि वाहनाने वेग धारण केल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दगडांच्या ढिगार्‍यावरून समोर असणार्‍या काटेरी झाडाला धडकून झाडात गुंतली. सुदैवाने गाडीत अमोल मुखेकर हे एकटेच होते. या दुर्घटनेत ते थोडक्यात बचावले.

चार महिन्यांपूर्वी मुखेकर महिंद्रा कंपनीची बॅटरीवर चालणारी एक्सयूव्ही 400 ही गाडी खरेदी केली होती. सकाळी ते या गाडीतून दुकानात आले. त्यानंतर कामानिमित्त बाहेरगावी जायचे असल्याने त्यांनी गाडी सुरू केली. यावेळी गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने गाडीने वेग घेतला. ब्रेक दाबून गाडी थांबविण्याचे प्रयत्न केले, परंतु गाडीने वेग धारण केल्याने गाडी दगडांच्या ढिगार्‍यावरून थेट काटेरी झाडांना धडकली. ुयात वाहनाचे नुकसान झाले आहे. अपघाताबाबत कंपनीला कळविण्यात आले असून, पुढील कार्यवाही त्वरित करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT