बछड्याचा मृत्यू pudhari
पुणे

Pune : वाहनाच्या धडकेत बछड्याचा मृत्यू

माणिकडोह येथे नेवून अंत्यसंस्कार

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गांवर मांजरवाडी बाह्यवळणाला हॉटेल निसर्गजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने तीन महिने वयाचा बिबट्याचा बछडा ठार झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ३१ जानेवारी) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

पुणे-नाशिक महामार्गांवर मांजरवाडी रस्त्याजवळ रस्ता ओलांडत असताना चारचाकी वाहनाची या बिबट्याच्या बछड्याला जोरदार धडक दिली व त्यात या बछड्याचा मृत्यू झाला. दरम्यान याच ठिकाणी तरस प्राण्याला देखील रस्ता ओलांडीत असताना वाहनाची जोरदार धडक या घटनेअगोदर दहा मिनिटांपूर्वी बसली. त्यात तो जखमी झाला. मात्र हा तरस बाजूच्या उसात पळून गेला. याबाबतची माहिती समजताच वन क्षेत्रपाल प्रदीप चव्हाण व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी मृत बिबट्याच्या बछड्याला माणिकडोह येथे नेवून त्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT