सीए अंतिम परीक्षा 3 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार file photo
पुणे

CA Exams: सीए अंतिम परीक्षा 3 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार

CA Exam News: विद्यार्थ्यांना हॉलतिकीट करता येणार डाऊनलोड

पुढारी वृत्तसेवा

CA Exams Update: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अर्थात आयसीएआयने नोव्हेंबर 2024 साठी सीए अंतिम परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध केले आहे. उमेदवार आता eservices.icai.org या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे लॉगिन क्रेडेंशिअल, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून त्यांचे हॉलतिकीट डाऊनलोड करू शकतील. सीए अंतिम परीक्षा 3 ते 13 नोव्हेंबरदरम्यान ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

जर उमेदवार प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी त्यांचा लॉगिन पासवर्ड विसरले असतील, तर ते लॉगिन विंडोवर उपलब्ध ‘फॉरगॉट पासवर्ड’ पर्याय वापरून पासवर्ड रिसेट करू शकतात. यासाठी उमेदवारांना नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि जन्मतारीख यासारखी मूलभूत माहिती द्यावी लागेल आणि सुरक्षा प्रश्नाचे उत्तरे देखील द्यावी लागतील.

उमेदवारांनी त्यांच्या तपशिलांची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी नेहमी उलट तपासणी करावी. काही विसंगती असल्यास उमेदवारांनी तपशील दुरुस्त करण्यासाठी परीक्षा आयोजित अधिकार्‍यांशी संपर्क साधावा, अशी सूचना संस्थेकडून देण्यात आली आहे.

...असे करा हॉलतिकीट डाऊनलोड

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. आता तुमचा नोंदणी क्रमांक किंवा मुखपृष्ठावरील लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून प्रवेशपत्र पोर्टलवर लॉगिन करा. यानंतर तुमचे सीए फायनल अ‍ॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. आता प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

सीएच्या झालेल्या परीक्षांचा निकाल नोव्हेंबरमध्ये

आयसीएआयने सीए फाउंडेशन आणि इंटरमीजिएट अभ्यासक्रमांचे निकाल अनुक्रमे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जाहीर केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निकालाच्या तारखेबद्दल माहिती देताना इन्स्टिट्यूटचे प्रमुख सीसीएम धीरज खंडेलवाल यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, फाउंडेशन सीएचा निकाल दिवाळीच्या पूर्वसंध्येला जाहीर केला जाऊ शकतो, शिवाय सप्टेंबर सेशनच्या सीए इंटरचा निकाल नोव्हेंबरच्या मध्यात लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT