पुणे

पिंपरी : बटन, रक्ताच्या ठिपक्यामुळे झाला खुनाचा उलगडा

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा  :  पिंपरी-चिंचवड शहरातील एका वकिलाचे अपहरण करून खून करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी मृतदेह महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना वकिलाच्या कार्यालयात पोलिसांना शर्टचे तुटलेले बटण आणि रक्ताचा एक ठिपका मिळून आला. दरम्यान, पोलिसांनी पुराव्याच्या आधारे सुतावरून स्वर्ग गाठत गुन्ह्याची उकल केली. गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने ही कामगिरी केली.  शिवशंकर दत्तात्रय शिंदे, असे खून करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. राजेश्वर गणपत जाधव (वय 42), सतीश माणिकराव इंगळे (वय 27), बालाजी मारुती एलनवर (24, सर्व रा. भक्तापूर, देंगलूर, नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर शिंदे यांचे विजयनगर, काळेवाडी येथे कार्यालय आहे. 31 डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या कार्यालयातून त्यांचे अपहरण झाले. त्याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शहरातील वकील मंडळींनीदेखील शिंदे यांच्या कार्यालयात धाव घेतली. या प्रकरणात घातपात झाल्याची शक्यता असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी शिंदे यांच्या शोधात पथके रवाना केली. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की, शिंदे यांच्या वर्णनाच्या एका व्यक्तीचा मृतदेह तेलंगणा राज्यात महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर आढळला आहे.

तो मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी तेलंगणा येथे धाव घेत मृत्यूदेह ताब्यात घेतला. ही कामगिरी उपायुक्त काकासाहेब डोळे, स्वप्ना गोरे, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर, श्रीकांत डिसले यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक एच. व्ही. माने, पोलिस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाधर चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभीरे, सुनील चौधरी, मयूर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, राम मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी व तौसिफ शेख यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT