पुणे

खडकवासला : अहिरे ग्रामपंचायतीची वॉर्डरचना बेकायदेशीर

अमृता चौगुले

खडकवासला : एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) प्रकल्पामुळे अहिरे गावठाणाचे पुनर्वसन झाले आहे. यामुळे ग्रामपंचायत वॉर्डाची रचना बेकायदेशीर करण्यात आली असल्याची तक्रार आमदार भीमराव तापकीर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. ही वॉर्ड रचना रद्द करण्याची मागणी तापकीर यांनी केली आहे.

गावठाणाचे 2017 मध्ये शंभर टक्के पुनर्वसन करण्यात आले. मात्र, वॉर्ड तसाच ठेवला आहे. तापकीर यांनी गेल्या 25 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे याबाबत दाद मागितली होती. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी आयोगाने याबाबत सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले होते. अहिरे ग्रामस्थांनीही याबाबत तहसीलदार, जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करूनही दखल घेतली नाही. आमदार तापकीर म्हणाले, की गावठाणाचे शंभर टक्के पुनर्वसन झाले असताना हा वॉर्ड कायम ठेवण्यात आला.

या वॉर्डात काळूबाईच्या माळ नावाची लोकवस्ती दाखवण्यात आली. तेथील 8 कुटुंबांत 27 लोकसंख्या दाखवली आहे. तर, मतदार मात्र 544 दाखवले आहेत. या ठिकाणी शासकीय निधी खर्च दाखवण्यात आला. प्रत्यक्षात हा भाग दुसर्‍या वॉर्डात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवासी घर अथवा वास्तव्य बंधनकारक आहे. असे असताना प्रत्यक्षात वास्तव्य न पाहता बेकायदेशीर वॉर्डरचना करण्यात आली आहे. याकडे तापकीर यांनी जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधले आहे.

याबाबत हवेली तहसीलदार कार्यालयाच्या निवडणूक विभागाशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, अहिरे ग्रामपंचायतीची प्रारूप वॉर्डरचना गेल्या 25 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्या वेळी ग्रामस्थांच्या उपस्थित वॉर्ड क्रमांक तीनमध्ये अहिरे गावठाण व मोकरवाडी येथील काही भाग समाविष्ट करण्यात आला होता, असे निवडणूक आयोगाला पाठविण्यात आलेल्या जिल्हाधिकार्‍यांच्या प्रस्तावात नमूद.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT