पुणे

औंध आयटीआयमध्ये व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम; ’सारथी’च्या लाभार्थ्यांना विनाशुल्क लाभ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्याक समाजातील महिला व युवक, तसेच 'सारथी' अंतर्गत लाभार्थ्यांसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे 15 नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

अल्पसंख्याक समाजातील, तसेच 'सारथी' अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी घटकातील काही कारणास्तव पूर्णवेळ किंवा दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाहीत, असे बेरोजगार युवक, युवती किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.

सुरुवातीला अल्पसंख्याक समाजातील युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग, ड्राफ्ट्समन- मेकॅनिकल, क्यूसी इन्स्पेक्टर लेव्हल 4, फील्ड टेक्निशियन- एसी, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन लेव्हल 3, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग/शील्डेड मेटल आर्क वेल्डिंग वेल्डर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सारथी अंतर्गत लाभार्थ्यांसाठी सध्या फक्त सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.

अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे, शिक्षण किमान इयत्ता आठवी ते दहावी उत्तीर्ण असावे.या अभ्यासक्रमांसाठी मुलींना प्राधान्य असून, प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता 30 आहे. किमान तीन महिन्याचा हा अभ्यासक्रम असणार आहे. इच्छुकांनी प्रवेशासाठी हीींिीं:// षेीाी. सश्रश/ ा7 क्षनेलले3 ठऋलाइर्रीं5 या लिंकचा उपयोग करावा. या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा लाभ घेऊन उमेदवारांनी कौशल्यवृद्धी करावी, असे आवाहन संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार
यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT