पुणे

जुन्नर शहराचे ग्रामदैवत सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये चोरी

अमृता चौगुले

जुन्नर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जुन्नर शहराचे ग्रामदैवत सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये ४ ऑगस्टला मध्यरात्री चोरीची घटना घडली. या घटनेत मंदिरातील गणपतीची चांदीची ५ किलोची मूर्ती, गणपतीच्या डोक्यावरील अर्धा किलोची चांदीची छत्री, ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे कान आणि मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

शनिवारी (दि. ५) सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथक व जुन्नर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मंदिर परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज तपासणी केले असता दोन ठिकाणच्या फुटेजमध्ये दोन चोरटे चित्रित झालेले आहेत. शहरातील रविवार पेठ या लोकवस्तीच्या भागात असलेल्या या मंदिरात चोरीची घटना घडल्याने शहर परिसरातील भाविकांमध्ये संतापाची भावना आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT