पुणे

शिरूरच्या मध्यवर्ती भागात घरफोडी; तब्बल 2 लाखांचा ऐवज चोरीस

अमृता चौगुले

शिरूर; पुढारी वृत्तसेवा: शिरूर शहरातील मध्यवर्ती भागात चोरट्यांनी तब्बल 2 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत श्रीहरी विठ्ठल मेंदरकर (रा. कापड बाजार पेठ, शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेंदरकर हे कुटुंबीयांसमवेत घरात झोपले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 50 हजार रुपये किमतीचा सव्वा तोळा वजनाचा सोन्याचा गंठण, 60 हजार रुपये दीड तोळा वजनाची सोन्याची मोहनमाळ, 30 हजार रुपये किमतीची सोन्याची कर्णफुले, 15 हजार रुपये किमतीची सोन्याची कर्णफुले, 5 हजार व 10 हजार रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट, 3 हजार रुपये किमतीचा आणखी एक हँडसेट, 30 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 2 लाख 3 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करीत आहेत. भरवस्तीत झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिस यंत्रणेबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

SCROLL FOR NEXT