बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांची महाराष्ट्रातील बसपा उमेद्वारांच्या प्रचारार्थ फुले, शाहू, आंबेडकरांची जन्मभूमी-कर्मभूमी असलेल्या पुण्यात रविवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता प्रादेशिक मनोरुग्णालय, मेंटल हॉस्पिटल मैदान, इ-कॉमरझोन आयटी पार्क समोर, येरवडा जाहीर सभा होणार आहे. बसपा राज्यात २३७ ठिकाणी स्वबळावर ताकदीनिशी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवित आहे.
या वेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत बसपाचे खाते खुलेल व बसपा बॅलन्सिंग पॉवर म्हणून महाराष्ट्रात उभारेल असा आमचा विश्वास आहे. बसपा ही निवडणूक मते खाण्यासाठी नसून निवडणूक जिंकण्यासाठी लढवित असल्याचे प्रदेश सचिव सुदिप गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी मोहम्मद शफी आणि जिल्हा अध्यक्ष दिलीप कुसाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.