पुणे

पुणे : भीमा नदीवरील पुलाचा पिलर कोसळला

निलेश पोतदार

दौंड : पुढारी वृत्तसेवा दौंड येथील भीमा नदीवरील दौंड-गार या गावांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरू असताना पुलाचा एक पिलर काल (रविवार) रात्री कोसळला. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या पुलाचे काम सुरू आहे. उन्हाळ्यात भीमा नदी पूर्ण कोरडी होती, परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. यामुळे धरणातून देखील थोडेफार पाणी नदीला सोडण्यात आले आहे.
रविवारी दि ९ रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे या कामावरील पिलरचा एक भाग कोसळला. त्यामुळे हे निकृष्ट दर्जाचे काम आहे हे यावरून सिद्ध होते, जर काम सुरू असते तर आणि हा असा प्रकार घडला असता तर नक्कीच कोणाला तरी आपला जीव गमवावा लागला असता.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता, या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हा पडला नसून याचा काही भाग वाकडा झाला होता. त्यामुळे आम्ही तो काढायला सांगितला असे म्हणून आपली चूक झाकणाच्या प्रयत्न बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे.

जर पिलरचा हा भाग वाकडा झाला असता तर संबंधित ठेकेदाराला या पुलावर देखरेख करणाऱ्या इंजिनियर व अधिकाऱ्यांनी त्याच वेळेस सूचना दिली असती. परंतु त्यावेळेस सूचना का दिली नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. एकंदरीतच आजूबाजूच्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा भाग हा कोसळला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे या कामाची चौकशी होणे देखील गरजेचे आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. दौंड सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी एवढे मुजोर झाले आहेत की कोणतीही माहिती स्पष्टपणे देत नाहीत. त्यामुळे या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT