पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्राप्तिकर मूल्यांकनाचे प्रकरण निकाली काढण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून एक लाख रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी तत्कालीन प्राप्तिकर अधिकार्याला तीन वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली. शेखर मधुकर खोमणे असे शिक्षा झालेल्या अधिकार्याचे नाव आहे. मांजरी खुर्द येथील एका बांधकाम व्यावसायिकाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे खोमणे विरोधात तक्रार दिली होती.
खोमणे याने तक्रारदारांना 2016-17 या आर्थिक वर्षाच्या प्राप्तिकर मूल्यांकनासाठी नोटीस पाठवली होती. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी खोमणे याने तक्रारदारांकडे एक लाख रुपयांची लाच मागितली, असे तक्रारीत नमूद होते. या तक्रारीची पडताळणी केल्यावर सीबीआयने सापळा रचून खोमणे याला गुलटेकडी येथील प्राप्तिकर भवनाच्या कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यावर 12 मार्च 2019 रोजी खोमणेविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अभयराज आरीकर यांनी काम पाहिले. सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाचे (सीबीआय-एसीबी) विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने खोमणे याला दोषी ठरवून शिक्षा