पुणे : पुढारी वृत्तसेवा : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर कुसगाव ढेकू गाव कि. मी. 56/900 व ओझर्डे ट्रॉमा केअर सेंटरजवळ कि.मी. 74/900 येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू आहे.
त्यामुळे आज (दि. 12) दुपारी 12 ते 2 या वेळेत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुणे दिशेला वळविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.
हेही वाचा