सलग दुसऱ्यांदा भाजपचे सिद्धार्थ शिरोळे विजयी  Pudahri
पुणे

Pune Assembly Elections Results: सलग दुसऱ्यांदा भाजपचे सिद्धार्थ शिरोळे विजयी

३६ हजार ६१४ मतानी विजयी

पुढारी वृत्तसेवा

Pune Elections Results: शिवाजीनगर मतदारसंघात मागील २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आणि कॉंग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात चुरसीची लढत झाली होती. मात्र यंदा पहिल्या फेरी पासूनच शिरोळे यांनी मताची आघाडी घेत ३६ हजार ६१४ मताधिक्यानी विजय मिळवला.

शिरोळे यांना 84 हजार 685 आणि बहिरट यांना 47 हजार 871 मते मिळाली. काँग्रेसचे बंडखोर अपक्ष मनीष आनंद 12 हजार 687 मते मिळाली. वंचित नंतर यंदा बंडखोर केदवारमुळे काँग्रेसला पुन्हा या मतदारसंघात पराभव पहावा लागला.

काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपने २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग तीन वेळा विजय मिळविला. मागच्या वेळी धाकधूक होती. शेवटच्या फेरी पर्यत धाकधूक होती. मात्र यंदा पहिल्या फेरी पासून सिद्धार्थ शिरोळ यांनी मताची आघाडी घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT