पुणे : पुढारी वृत्तसेवा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीचा विस्तार गुरुवारी जाहीर केला. त्यामध्ये पुण्यातील पाच जणांचा, तर पिंपरीतील एकाचा समावेश आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे, विनायक आंबेकर, अली दारूवाला, कुणाल टिळक आणि संदीप खर्डेकर या पुण्यातील पाच जणांचा समावेश आहे.
पिंपरीतील माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनाही प्रवक्ते करण्यात आले आहे. प्रदेश प्रवक्त्यांची एकूण संख्या 42 झाली आहे. टिळक यांची प्रवक्तेपदी निवड झाल्याने, कसबा पेठ मतदारसंघातून टिळक कुटुंबीयांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.