हर्षवर्धन पाटील  pudhari
पुणे

ठरलं तर ! पितृपंधरवडा संपताच भाजप नेते हर्षवर्धन पाटील घेणार मोठा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पितृपंधरवडा संपताच भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील मोठा राजकीय निर्णय घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर जाऊन तुतारी फुंकण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. इंदापूर तालुक्यातील वडापूरी येथे आज शनिवारी हर्षवर्धन पाटील यांनी मतदारांशी संवाद साधलाय आणि या संवादा वेळीच कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असा नाराही दिला.

2024 ची निवडणूक आपण लढवावी असा जनतेचा आग्रह असून कोणतं चिन्ह घ्यावं काय करावं याबाबत जनतेने स्पष्ट मत मांडले आहे. लोकशाहीत जनता श्रेष्ठ असते, जनतेचा जो आग्रह आहे त्याचा मी विचार करावा असं तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून माझ्यावर दबाव आहे. पितृ-पंधरवाडा संपताचं याबाबतचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल. जनतेच्या मनामध्ये जे आहे त्याला मला डावलता येणार नाही यावर योग्य तो निर्णय करून पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटल असून मी हर्षवर्धन पाटील यांच्याशी आज बोलणार आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते मात्र अद्याप पर्यंत ते माझ्याशी बोलले नाहीत असे ही पाटील यांनी सांगितले.

शरद पवारांसह एका मंचावर येणार

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे. आणि या सोहळ्याचं निमंत्रण मला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलेले आहे.या निमंत्रणाचा स्वीकार मी केलाय आणि त्यामुळे शरद पवारांसोबत मी एका मंचावरती या कार्यक्रमाला जाणार आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT