पुणे

स्पर्धा परीक्षार्थींची बायोमेट्रिकद्वारे नोंद

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  संयुक्त पूर्वपरीक्षेत गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) उमेदवारांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने केली जाणार आहे. तसेच परीक्षेनंतर सर्व उपकेंद्रांवरील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी करण्यात येईल. त्यात उमेदवारांकडून आक्षेपार्ह वर्तन केल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवारांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा एमपीएससीने दिला.

महाराष्ट्र अराजपत्रित गट 'ब' व गट 'क' सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2023 ही परीक्षा रविवारी (30 एप्रिल) सर्व 37 जिल्हा केंद्रांवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेवेळी केल्या जाणार्‍या उपाययोजनांबाबतची माहिती एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. सर्व परीक्षा उपकेंद्रांवर सीसीटीव्ही चित्रीकरणासह उमेदवारांची उपस्थिती बायोमेट्रिक पध्दतीने नोंदविण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षा सुरू झाल्यावर व प्रत्यक्ष कालावधी सुरू झाल्यानंतर ते संपेपर्यंत आपापसात कोणत्याही कारणास्तव बोलणे, कोणत्याही वस्तूंची देवाणघेवाण करणे, पर्यवेक्षकीय कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणे, परवानगी नसलेली कोणतीही वस्तू, साहित्य जवळ बाळगणे, परीक्षेच्या आयोजनात अडथळा आणणे आदी कृत्य गैरप्रकाराचा प्रयत्न समजण्यात येईल.

अशाप्रकरणी आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल. परीक्षेनंतर सर्व उपकेंद्रांवरील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी करण्यात येईल. सदर तपासणीमध्ये कोणताही उमेदवार आक्षेपार्ह वर्तन करीत असल्याचे आढळून आल्यास अशा उमेदवारांवर परीक्षेतील गैरप्रकाराचा प्रयत्न समजून कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT