कुरकुंभ: कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीतून भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाच मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. सोमवारी (दि.१९) सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
राजेंद्र मेरगळ (वय ३०) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. तर चंद्रकांत जाधव (वय ४० रा. मळद ता. दौंड) हे जखमी झाले आहेत. याबाबत भाऊसाहेब मेरगळ (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
कारच्या चालकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ गावच्या हद्दीतील गिरमेवस्ती येथून राजेंद्र मेरगळ आणि चंद्रकांत जाधव दुचाकीवरून जात होते.
यादरम्यान भरधाव वेगातील कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातात राजेंद्र मेरगळ यांना डोक्यास, हातापायास, किरकोळ व गंभीर दुखापती होऊन मृत्यु झाला. तसेच चंद्रकांत जाधव यांच्या हाताला, पायाला व बरगडीस किरकोळ व गंभीर दुखापत झाली आहे.