पुणे

लोणावळा : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अमृता चौगुले

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर त्याच्या मागे बसलेली युवती ही गंभीर जखमी झाली आहे. वरसोली (ता. मावळ) येथे मन:शक्ती केंद्राच्या पुढे हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. 4 रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मोटारसायकल (क्र. यू.पी. 32 एन.के. 8202) व डंपर (क्र. एम.एच. 14/4567) यांच्यात धडक झाली.

जुन्या मुंबई महामार्गावर मुंबई पुणे लेनवर झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार मोहम्मद हमजा खान (वय 20 वर्षे, रा. सरफराजगंज, लखनऊ, उत्तरप्रदेश) हा व मोटारसायकलवर त्याच्या मागे बसलेली मुलगी सायमा चांद पाशा शेख (वय 20 वर्ष, रा. कोरीगल्ली, लातूर) ही गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारास महावीर हॉस्पिटल, कामशेत येथे अ‍ॅम्ब्युलन्सने आणले असता मोटारसायकलस्वार मोहम्मद हमजा खान हा उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रकरणी तपास लोणावळा ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT