पुणे

कार्ला : टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

अमृता चौगुले

कार्ला; पुढारी वृत्तसेवा : कार्ला फाट्यावरून आई एकरवीरा देवीच्या मंदिराकडे जाणार्‍या वेहरगाव रोडवर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पिकअप टेम्पो (एम एच 14- जी यु 5058) स्विफ्ट आणि दुचाकी, अशा दोन वाहनांना जाऊन धडकल्याने अपघात घडला. या अपघातात सदापूर येथील दुचाकीस्वार विकास पोपट घारे यांंच्या पायाला गंभिर मार लागला आहे.

तर स्विफ्टमधील दोन महिला जखमी झाल्या आहेत. हा अपघात इतका जबरदस्त होता की, पीकअप टम्पोने डिव्हायडर तोडून एकविरा देवी दर्शन करुन येणार्‍या भावीकांच्या स्विफ्टला व दुचाकीला धडक दिली. सुदैवाने या अपघतात जिवीतहानी झाली नाही. अपघातानंतर जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात कार्ला येथील खाजगी हलविण्यात आले आहे.

वेहरगाव रोडच्या रुंदीकरण व क्राँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या रोडवर हा अपघात झाला आहे. रोडचे काम सुरु असल्याने काही ठिकाणी डायव्हर्शन देण्यात आले आहेत. वाहन चालकांनी अंतर्गत रस्त्यावर वाहने कमी वेगाने चालविणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे या अपघातावरुन समोर येत आहे.

अपुर्‍या कामामुळे अपघात
या रस्त्याचे काम सुरू असतानाच एकाला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत दोन ते तीन अपघात या रस्त्यावर झाले असून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून काम निकृष्ट प्रकारचे होत आहे. या कामामुळेच अपघाला निमंत्रण मिळत असल्याचा आरोप मनसेचे अशोक कुटे यांनी केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT