पुणे

पुणे : मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; अपघातग्रस्त कारही पलटी

अमृता चौगुले

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : 

किर्तनाला हजेरी लावून दुचाकीवरून आपल्या घरी परतणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला समोरून डुलत डुलत आलेल्या मद्यधुंद कारचालकाने अत्यंत बेदरकारपणे गाडी चालवत विरुध्द दिशेने वेगात येते जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त कार पुढे जाऊन एका झाडाला धडकून पलटी झाली.

हा अपघात गुरुवारी (दि. १५) रात्री ११ वाजेच्या सुमारास ओतूर ते ब्राम्हणवाडा रोडवरील रोहकडी गावचे हद्दीत महालक्ष्मी नगर बसथांब्याजवळ झाला. ह.भ.प. नामदेव महाराज महादेव घोलप (वय ६८) यांचा या अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर घोलप यांना स्थानिकांनी त्वरेने ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रोहकडीच्या दिशेने जाणाऱ्या डिस्कव्हर (एमएच १४ डीडी ५१८५) ला ओतूरच्या दिशेने येणाऱ्या वॅगन आर कार (एमएच ०५ इक्यू ३६६४) ने धडक दिल्याने हा अपघात झाला. हिरामण बन्सी गोंदके (रा. करंडी, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे मद्यपी कारचालकाचे नाव आहे. त्यास ओतूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान रोहकडी गावचे अत्यंत धार्मिक वृत्तीचे प्रसिद्ध गायक नामदेव महाराज घोलप यांचे या अपघातात निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT