पुणे

भुजबळांनी मला शुभेच्छा दिल्या: राज्‍यसभा अर्ज दाखल केल्‍यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राज्‍याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (दि.१३) राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी  बाेलताना त्‍या म्हणाल्या की, "छगन भुजबळ नाराज नाहीत, सर्वांच्या सहमतीने हा निर्णय झालेला आहे. त्‍यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत."

भुजबळांनी मला शुभेच्छा दिल्या…

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला होता. या पराभवानंतर त्यांना राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर अजित पवार गटात नाराजीनाट्य सुरु झाले. छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होवू लागली. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी आज (दि.१३) अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी  बोलत असताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, " मंत्री छगन भुजबळ यांनी मला आज शुभेच्छा दिल्या आहेत. ते नाराज नाहीत. सर्वांच्‍या सहमतीने मी राज्‍यसभा पाेटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर पार्थ पवार यांचीही सहमती आहे."

काय म्हणाले होते छगन भुजबळ?

आज सकाळी माध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले हाेते की, राज्‍यसभा पाेट निवडणुकीसाठी माझ्यासह आनंद परांजपे, बाबा सिद्धी इच्छूक होते; पण चर्चेअंती सर्वांच्या मताने सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे, या निर्णयामुळे मी नाराज नाही.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT