पुणे

पुणे : भोसले क्रीडांगण समस्यांच्या विळख्यात

अमृता चौगुले

हडपसर : पुढारी वृत्तसेवा : येथील अमर सोसायटी भागातील भोसले क्रीडांगण नागरिकांसाठी आरोग्यदायी ठिकाण आहे. मात्र, सध्या हे क्रीडांगण कचरा, अस्वच्छता आणि दुर्गंधी आदी समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. या ठिकाणी झुडपेही वाढली आहेत. तसेच हा परिसर मद्यपींचा अड्डाही बनला आहे. स्वच्छतागृहांच्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, महापालिकेने याठिकाणी लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हडपसर भागात नागरिकांसाठी उद्याने व क्रीडागंणे आहेत. मात्र, पालिका उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. भोसले क्रीडांगणाची तर 'आओ जाओ घर तुम्हारा…' अशीच स्थिती बनली आहे. सुमारे चार एकर आरक्षित असलेले क्रीडांगण मद्यपी व गांजा सेंटर व तसेच दिवसरात्र तरुण-तरुणीचे अश्लील चाळे यासाठी बदनाम झाले आहे. या खुल्या मैदानात सकाळी फिरायला येणार्‍या नागरिकांची गर्दी असते. मात्र, अस्वच्छतेमुळे नागरिक हतबल झाले आहेत. स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. परिसरातील गवत काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

डपसर परिसरातील भोसले क्रीडांगणात आम्ही सकाळी फिरायला येतो. मात्र, येथील दुर्गंधीचा त्रास होतो. या ठिकाणी सुरक्षारक्षकला राहण्यासाठी कोठी नाही. यामुळे रात्री या ठिकाणी कोणीच नसते. परिणामी, रात्री या परिसराला बारचे स्वरूप येते. सुरक्षारक्षक असले, तरी अनेकदा ते वेळ पाळत नाहीत. दोन्ही गेट मोडकळीस आले आहेत.
                                                                    – जावेद मुलाणी, नागरिक

अमर कॉटेज परिसरातील भोसले क्रीडांगणाबाबत तक्रारी आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वच्छता व गवत काढून व गेट बसविण्याबाबत प्रस्ताव पाठवला जाईल.
                                         – बाळासाहेब ढवळे, सहायक आयुक्त, महापालिका.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT