पुणे

पिंपरी : ‘पीएमआरडीए’च्या गृहप्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यातील कामाचे ऑनलाइन भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्टला पुणे येथून होणार आहे. पंतप्रधान मोदी हे 1 ऑगस्ट रोजी पुणे दौर्‍यावर येणार आहेत. त्या वेळी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आवास योजनेचे भूमिपूजन होणार आहे. हा कार्यक्रम शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावरुन ऑनलाईन होईल.

पीएमआरडीएकडून पेठ क्रमांक 12 मध्ये साकारलेल्या गृहप्रकल्पात पहिल्या टप्प्यात 4 हजार 883 घरे उभारण्यात आली आहेत.
तर, दुसर्‍या टप्प्यामध्ये 6 हजार 456 घरे उभारण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्यातील कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल. तर, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 3 हजार 67 नागरिकांना घरांचे ताबे देण्यात आले आहे. या प्रकल्पातील शिल्लक सदनिकांच्या वितरणासाठी नोंदणी, सोडत व अन्य प्रक्रियेला ऑगस्ट महिन्यात सुरुवात होणार आहे.

SCROLL FOR NEXT