मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  Pudhari
पुणे

कार्ला गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

कार्ला गडावर विविध विकासकामे करण्यासाठी एमएसआरडीसीने 39 कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच, ऐतिहासिक बुद्ध लेण्यांचा विकास करण्यासाठी 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्ला फट्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी पूल बांधण्याचे निर्देश दिले आहेत. कार्ला गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला वेहरगाव येथील आई एकवीरा देवी परिसरात तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत 39 कोटी 43 लाख रुपये निधीतून होणार्‍या विकासकांमाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंच्या हस्ते शुक्रवारी (दि. 4) झाले, या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार व मुख्य विश्वस्त सुरेश म्हात्रे, देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद हुलावळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, देवस्थानचे उपाध्यक्ष मारुती देशमुख, सरपंच पूजा पडवळ, दीपाली हुलावळे, सचिव नवनाथ देशमुख, विकास पडवळ, सागर देवकर, संजय गोविलकर, बाळासाहेब भानुसघरे, उपसरपंच शंकर बोरकर, अंकुश देशमुख, मदन भोई, राजू देवकर, अनिल पडवळ, दत्तात्रय केदारी, अनिल गायकवाड, सुनील येवले, अशोक पडवळ, नंदकुमार पदमुले आदी उपस्थित होते. मुख्य मंदिर, नगारखान्याची दुरुस्ती, स्तंभ व समाधीचे दगडी बांधकामाची सफाई आणि सांधे भरणी, नवीन रांग-मंडप उभारणी, शौचालय बांधणे, दगडी पादचारी रस्ता तयार करणे, पायर्‍यांची दुरुस्ती, संरक्षण भिंत, पार्किंगचे बांधकाम, धबधब्याजवळ तटबंधी दुरुस्ती, विश्रांती कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय यांसह अन्य विकास कामे केली जाणार आहेत.

आज मंदिर दिवसभर सुरू राहणार

नवरात्रोत्सवात भाविकांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे शनिवारी (दि. 5) मंदिर दिवसभर सुरू राहणार आहे. तसेच, गुरुवारी (दि. 11) आणि शुक्रवारी (दि. 12) मंदिर दिवसभर सुरू राहणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT