पुणे

सासवड : भिवरीत खासदार केसरी बैलगाडा शर्यतींची रंगत

अमृता चौगुले

सासवड(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : भिवरी, पठारवाडी येथे श्री काळूबाई यात्रेनिमित्त पुणे जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य योगेश फडतरे यांच्या प्रयत्नातून खासदार केसरी बैलगाडा शर्यत पार पडली. यात आई गावदेवी प्रसन्न किरण म्हात्रे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. म्हात्रे यांना बुलेट, चांदीची गदा, चषक, ट्रॉफी असे बक्षीस देण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

यामध्ये निसर्ग गार्डन मांगडेवाडी द्वितीय, मुकाई प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडकवासला तृतीय, ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुजा नितीन शेवाळे हडपसर चतुर्थ, हॉटेल ग्रँड पुरंदर दीपक घाटे पठारवाडी पाचवा व सहावा, विक्रस कटके भिवरी सातवा यांनी बक्षीस जिंकले. फायनलसाठी प्रत्येकी 1 ते 6 नंबरला चांदीची गदा, चषक, ट्रॉफी देण्यात आली. शर्यतीत 260 बैलगाडांचे स्पर्धक सहभागी झाले होते.

बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचा अजोड असा वारसा आहे. या शर्यतीला उपस्थित राहून आनंद वाटला, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी या वेळी सांगितले. या वेळी आमदार संजय जगताप, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी जि. प. सदस्य सुदाम इंगळे, विजय कोलते, बबूसाहेब माहुरकर, तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस गणेश जगताप, शामकांत भिंताडे, ईश्वर बागमार, एम. के. गायकवाड, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, सासवड शहराध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, महिलाध्यक्षा गौरी कुंजीर, सरपंच विशाल कटके आदी उपस्थित होते.

बैलगाडा शर्यतीचे संयोजन नाना पिसे, राहुल घाटे, रणजित घिसरे, पांडुरंग घिसरे, विजय घाटे आदींसह पुरंदर तालुका बैलगाडा मालक संघटना पठारवाडी, आस्करवाडी, भिवरी, बोपगाव, चांबळी, हिवरे, गराडे, कोडीत, दिवे, सोमुर्डी पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने वतीने करण्यात आले होते.

SCROLL FOR NEXT