पुणे : भीमथडी जत्रेमध्ये महिला बचत गटातील महिलांकडून उत्पादित विविध वस्तूंच्या खरेदीस पुणेकर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
त्यातून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळून त्यांचा व्यवसायातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे. शिवाय, त्यातून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे.
कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील मैदानावर आयोजित केलेल्या 'भीमथडी जत्रे'च्या तिसऱ्या दिवशी ग्रामीण भागातील बचत गटांतील महिलांनी हाताने बनविलेले विविध पदार्थखरेदीस पुणेकर ग्राहकांनी पसंती दिल्याचे दिसून आले.
त्यामध्ये उन्हाळी पदार्थ, चिया सीड्स, गवती चहा, पुदिना व आले पावडर, विविध मसाले, गावरान तूप, विविध प्रकारची लोणची, सिद्धटेकच्या प्रसिद्ध चामड्याच्या वस्तू आदींचा प्रामुख्याने समावेश होता. हीच बाब ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करत आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवत असल्याचे कळविण्यात आले आहे.
---------------
// भीमथडी फोल्डरमध्ये - फोटो सेव्ह आहेत.
फोटो ओळी:
- महिला बचत गटांकडून उत्पादित वस्तूंना खरेदीसाठी गर्दी होत आहे.
// पुणे ऑलसाठी