भोर; पुढारी वृत्तसेवा : भावेखलच्या ग्रामस्थांनी एकी दाखवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला हे कौतुकास्पद आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याने गावची विकासकामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले. भावेखल येथे विकासकामांचे भूमिपूजन आमदार थोपटे यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते.
तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम कोंढाळकर, उपसरपंच मुक्ता भरत मादगुडे, ग्रामपंचायत सदस्य आशा वाटकर, सविता वाटकर, प्रदीप गाडे, बबन गाडे, भरत मादगुडे, सुरेश दळवी, शंकर मादगुडे आदींसह ग्रामस्थ, महिलांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार थोपटे यांनी प्रवेश केलेल्या ग्रामस्थांचे स्वागत केले. या प्रसंगी राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरुपा थोपटे, गीतांजली आंबवले, बाळासाहेब थोपटे, गीतांजली शेटे आदींसह विविध गावचे सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
विरोधकांवर नाव न घेता टीका
राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रतिनिधी म्हणून कामे सुचवत असतो. पाठपुरावाही करतो, मात्र आता कोणीही कुठल्या पदावर नाही तरी ते नारळ फोडत सुटले आहेत, अशी टीका थोपटे यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांवर केली.