Bhausaheb Rangari Ganpati Vasapuja
पुणे: गणेशोत्सवात लाखो भाविक येतात. पोलिसांची संख्या त्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने पोलिसांसारखे काम करावे, असे आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केले.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे आयोजित वासापूजन सोहळा बनसोडे यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी ते बोलत होते. (Latest Pune News)
या वेळी बनसोडे म्हणाले, हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेश मंडळाच्या वासा पूजनाचा मान दिल्याबद्दल आभारी आहे. गणेशोत्सवाची आता सुरुवात होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होईल, त्यासाठी रंगारी ट्रस्टसह सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आम्हाला मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वासापूजन सोहळ्यापूर्वी रंगारी भवनात बाप्पाची आरती झाली. या वेळी शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने केलेल्या वादनाने उपस्थित गणेश भक्तांची मने जिंकली.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वासापूजन सोहळ्याने गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. यावर्षी आम्ही ‘रत्नमहाल’ हा देखावा साकारणार आहे. भारतातील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि मोती यांचा मिलाप या ‘रत्नमहाल’ मध्ये असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रथाला बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तो या वर्षीही कायम राहणार आहे.- पुनीत बालन, उत्सवप्रमुख व विश्वस्त