पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात गेल्या आठवड्यात 12 लहान मुलांना टायफॉईडची लक्षणे दिसल्याने अॅडमिट करण्यात आले होते. यापैकी सहा जणांमध्ये टायफॉईडचे निदान झाले. मान्सूनच्या सुरुवातीलाच लहान मुलांमध्ये टायफॉईडचा धोका वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात मंगळवार पेठेतील सदानंदनगर या एकाच इमारतीतील 5 ते 10 वर्षे वयोगटातील 12 मुलांना कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी सहा जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर चार मुले बरी झाली. टायफॉईडसारखी लक्षणे असलेल्या आणखी तीन मुलांना रविवारी कमला नेहरू हॉस्पिटलच्या बालरोग विभागात दाखल करण्यात आले. या तीन मुलांपैकी कोंढवा येथील रहिवासी असलेल्या एका सहा वर्षांच्या मुलीला टायफॉईडची लागण झाली.
सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, सदानंदनगर इमारतीतील मुलांच्या आजारात वाढ झाल्याने पाण्याचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नळातून गोळा केलेले पाण्याचे नमुने स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आहेत. पाण्याच्या टँकरमधून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल येणे
बाकी आहे.
हेही वाचा