पुणे

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बारामतीत मोहीम

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी हद्दीतील पोलिस ठाण्यात मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांची तालुकानिहाय नेमणूक करून विशेष मोहीम राबविली आहे. या पथकाकडून पहाटे 5 ते सकाळी 10 व संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत जनजागृतीसह वाहनांवर कारवाई केली जात आहे.

वायुवेग पथकाकडून हे काम केले जात आहे. या पथकामध्ये मोटार वाहन निरीक्षक हेमंतकुमार सोलणकर, सहायक मोटार वाहन निरीक्षक हेमलता तावरे, धैर्यशील लोंढे, ऋषिकेश हांगे, विशाल पाटील, चालक विठ्ठल गावडे, महादेव तनपुरे आदींचा समावेश आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे.

वाहतूक नियमांसंबंधी जनजागृती, प्रबोधन केले जात आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, पुणे-सोलापूर महामार्ग, यवत या ठिकाणी कारवाई करण्यात आली. महामार्गावर रात्री बसची तपासणी करून बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या 22 बसवर कारवाई करण्यात आली. बारामती एमआयडीसीमधील कंपन्यांतील अधिकार्‍यांशी भेट घेत सूचना दिल्या. शहर परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थांना वाहतुकीच्या नियमावलीचे पुस्तक व पत्रकांचे वाटप करण्यात आले. प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

दृष्टिक्षेपात कारवाई

  • वायुवेग पथकाला दिलेला मासिक लक्ष्यांक – 30 लाख रुपये
  • मार्चमध्ये केलेली दंडात्मक कारवाई – 58 लाख 50 हजार रुपये
  • कारवाई केलेली एकूण वाहने – 849
  • विनालायसन्स वाहन चालविणे – 186 वाहनचालक
  • हेल्मेट न घालता वाहन चालविणे – 156 वाहनचालक
  • विनासीटबेल्ट वाहन चालविणे – 65 वाहनचालक
  • ट्रिपल सीट वाहन चालविणे – 17 वाहनचालक
  • वाहन चालविताना मोबाईलचा वापर – 41 वाहनचालक
  •  रिफ्लेक्टर नसणे – 109 वाहने
  • विरुद्ध दिशेने वाहन चालविणे – 9 वाहनचालक
  • भारक्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेणे – 17 वाहने

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT