accident File Photo
पुणे

Baramati Accident | मुर्टीजवळ ऊसतोड मजुरांची ट्रॉली उलटली; महिलेचा मृत्यू, अनेक मजूर जखमी

अजिंक्यतारा साखर कारखान्याकडे दोन ट्रॅक्टरमधून ऊसतोड मजूर जाताना दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

Sugarcane Workers Trolley Overturns

बारामती : तालुक्यातील मुर्टी गावाजवळ ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत एका महिला ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी (दि. 12) पाच वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा साखर कारखान्याकडे दोन ट्रॅक्टरमधून ऊसतोड मजूर जात होते. यावेळी मुर्टी गावाजवळ एका ट्रॅक्टर चालकाने पुढील ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका ट्रॅक्टरचे चाक दुसऱ्या ट्रॉलीत अडकल्याने ट्रॉली उलटली.

या ट्रॉलीमध्ये सुमारे १५ ते २० ऊसतोड मजूर बसले होते. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT