नगररचनाकार विकास किशोर ढेकळे. Pudhari File Photo
पुणे

बारामती नगरपरिषदेच्या नगररचनाकाराला लाच प्रकरणी अटक

एक लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

पुढारी वृत्तसेवा

बारामती : बारामती नगरपरिषदेचे नगररचनाकार विकास किशोर ढेकळे यांना लाच मागणी प्रकरणात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास शहरातील एका जिममधून ढेकळे यांना एसीबीने ताब्यात घेत अटक केली. जीममध्ये एसीबीने केलेल्या या कारवाईची मोठी चर्चा शहरात झाली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बारामती नगरपरिषदेचा नगररचना विभाग सातत्याने विविध कारणांनी चर्चेत असतो. ढेकळे हे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच पुण्याहून बारामती नगरपरिषदेत बदलून आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी नुकतीच दहा दिवसांची दुबई टूर केल्याची माहिती समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT