Girl Death File Photo
पुणे

Baramati Crime : बारामतीतील ‘त्या’ अल्पवयीन मुलीने जीवन संपविले; 5व्या मजल्यावरून उडी मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न

पुढारी वृत्तसेवा

बारामती : बारामती शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या (PA) अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला आहे. आई रागावल्याच्या कारणावरून या मुलीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे, अशी अधिकृत माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी बारामती परिसरातील रुई येथील साई गणेश नगरमध्ये राहणारी ही अल्पवयीन मुलगी आई रागावल्यामुळे घरातून निघून गेली होती. ती घरी न परतल्याने २३ ऑगस्ट रोजी तिच्या अपहरणाची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. पोलीस तिचा शोध घेत असतानाच तिचा मृतदेह आढळून आला.

घटनेचा सखोल तपास केला असता, संबंधित मुलगी जवळच असलेल्या एका पाच मजली इमारतीवर गेली होती. तिने टेरेसचा दरवाजा बाहेरून बंद करून तेथून खाली उडी मारल्याचे समोर आले आहे. घटनास्थळावर तपासणी केली असता टेरेसवर तिची चप्पलही आढळून आली. या सर्व पुराव्यांवरून आणि परिस्थितीजन्य नोंदींवरून हा घातपात नसून आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT