कृषिक प्रदर्शन Pudhari
पुणे

कृषिक प्रदर्शनात यंदा बारामतीत गर्दीचा उच्चांक; प्रदर्शनाचा समारोप

पुढील वर्षी 15 ते 19 जानेवारीला आयोजन

पुढारी वृत्तसेवा

बारामतीच्या अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषिक या दहाव्या कृषी प्रदर्शनाचा सोमवारी (दि. 20) अलोट गर्दीत समारोप झाला. पाचदिवसीय प्रदर्शनाला महाराष्ट्राच्या विविध भागांसह देशातील अन्य राज्यांतील शेतकर्‍यांनी भेटी देत शेतीचे नवे तंत्रज्ञान जाणून घेतले.

ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, हिंदुस्थान फीड्सचे व्यवस्थापक अजय पिसाळ, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. रतन जाधव, युवा उद्योजक महेश गुळवे यांच्या हस्ते श्वान, दुग्ध उत्पादन, देशी गोवंश स्पर्धेतील विजेत्यांना सोमवारी (दि. 20) रोख रक्कम, प्रशस्तिपत्र व चषक देत गौरविण्यात आले. स्पर्धेची बक्षिसे बारामती अ‍ॅग्रोकडून देण्यात आली.

पाच दिवसांत लाखो शेतकर्‍यांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रावरील या प्रदर्शनाला भेट दिली. हे दहावे कृषिक गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणारे ठरले. केंद्राचे शास्त्रज्ञ, विषय विशेषज्ञ तसेच अन्य अधिकारी-कर्मचार्‍यांनी या कामी मोठी मेहनत घेतल्याचे सीईओ प्रो. नीलेश नलवडे यांनी सांगितले. सर्व सहभागी कंपन्या, स्टॉलधारक, केव्हीकेचे व संस्थेचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवक व सहभागी शेतकरी यांचे त्यांनी विशेष आभार मानले. पुढील वर्षी 15 ते 19

जानेवारी या कालावधीत 11 वे कृषिक प्रदर्शन आयोजित केले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

श्वान स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे...

टॉय ब्रीड - प्रथम - आकाश मोरे (शारदानगर), द्वितीय - अजिंक्य मोरे (शारदानगर), तृतीय - आदित्य जाधव (बारामती)

इंडियन ब्रीड - प्रथम - अर्जुन आढाव (कटफळ), द्वितीय - कैलाश किर्वे (बारामती), तृतीय - आदित्य जाधव (बारामती)

वर्किंग ब्रीड - प्रथम - नकुल शिंदे, द्वितीय - गौरव नलावडे, तृतीय - अक्षय दळवी

देशी गोवंश गाय वर्ग स्पर्धा : बालाजी केंद्रे, लातूर (लाल कंधारी गाय ), वैभव केंद्रे , लातूर (देवणी गाय), धनाजी पाटील, राधानगरी, कोल्हापूर (काँन्क्रेज गाय).

दुग्ध गाय स्पर्धा : या स्पर्धेमध्ये गायींचे रोज दूध काढले जात होते. त्या आधारावर विजेत्यांची निवड करण्यात आली. प्रथम - हरिश येडे, येडेवाडी, दौंड (43 लिटर प्रतिदिन), द्वितीय क्रमांक - अविरत पानसरे, बारामती (42 लिटर प्रतिदिन), तृतीय - गणेश होळकर, सदोबाचीवाडी, बारामती (37.6 लिटर प्रतिदिन)

हिरकणी कालवडी स्पर्धा : प्रथम - रोहित घाडगे (सांगोला), द्वितीय - केतन शिंदे (अंथुर्णे), तृतीय - सागर चव्हाण (पंढरपूर). अमित शिंदे, उरुळी कांचन यांच्या कमांडो या दीड टन वजनाच्या रेड्याला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT