पुणे

Baramati Bypoll Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ

Sunetra Pawar : अन् सुनेत्रा पवार यांना अश्रू आवरता आले नाहीत

पुढारी वृत्तसेवा

बारामती : कन्हेरी (ता. बारामती) येथे रविवारी बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केला. यावेळी त्यांनी सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेला मंत्री आदिती तटकरे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, आ. सना मलिक, आ. सुनील शेळके, आ. शंकर मांडेकर, आ. संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामठे, सुरेश घुले, पृथ्वीराज जाचक, पुरुषोत्तम जगताप, सचिन सातव, बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, किरण गुजर, किरण तावरे, विश्वास देवकाते, ज्योती मेटे, सुरेंद्र जेवरे, सुनील शिंदे, अविनाश मोटे आदी उपस्थित होते.

सभेपूर्वी सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले. यावेळी जय पवार आणि ऋतुजा पवार उपस्थित होते. सभेदरम्यान अजित पवार यांच्या आठवणींनी वातावरण भावनिक झाले होते. त्यांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा उल्लेख होताच सुनेत्रा पवार यांना अश्रू आवरता आले नाहीत.

कुटुंबातील अन्य सदस्य अनुपस्थित

कन्हेरी येथील सभेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार, तसेच त्यांची पत्नी ऋतुजा पवार यांनी उपस्थिती लावली. मात्र, शरद पवार गटाकडून कोणताही प्रमुख नेता किंवा प्रतिनिधी सभेत सहभागी झाला नव्हता. पवार कुटुंबातील इतर सदस्यांची अनुपस्थिती आणि दोन कुटुंबांतील वाढती दरी, यामुळे बारामतीतील राजकीय चर्चांना वेग आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT