Sunetra Pawar Pudhari
पुणे

Baramati By-Election: बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? १९९२ नंतर प्रथमच अजितदादा सोडून अन्य उमेदवार होणार आमदार

Sunetra Pawar Baramati By-Election : राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची उमेदवारी निश्चित

पुढारी वृत्तसेवा

बारामती : अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची पोट निवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक बिनविरोध होण्याचीच अधिक शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बारामती जवळ दि. २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. बारामतीत १९९२ नंतर प्रथमच अजित पवार सोडून अन्य उमेदवार आमदार होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाच्या अध्यक्षा तथा राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची उमेदवारी निश्चित आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या पोटनिवडणुकीसंदर्भात विरोधकांना आवाहन करत बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या निवडणुकीबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

२३ एप्रिल रोजी मतदान

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारामती विधानसभेसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीसाठी ३० मार्च रोजी अधिसूचना जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल, अर्जांची छाननी ७ एप्रिल, तर ९ एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर २३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT