Sunetra Pawar Pudhari
पुणे

Baramati By Election 2026 Live: बारामतीत सुनेत्रा पवार मोठ्या विजयाच्या दिशेने

मतमोजणीत प्रचंड आघाडी; विक्रमी मताधिक्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

15 फेरीनंतर सुनेत्रा पवार आघाडीवर

  • एकूण झालेले मतदन - ११२२४

  • सुनेत्रा पवार यांना

  • झालेले मतदान - ११०६१

  • इतर मते - १६४

  • १५ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना झालेले एकूण मतदान - १,३२,९१६

  • इतरांना गेलेली एकूण मते - २६३१

14 वी फेरी

  • एकूण झालेले मतदान - ९७८२

  • सुनेत्रा पवार यांना झालेले मतदान - ९५८७

  • इतर मते - १९५

  • १४ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना झालेले एकूण मतदान - १,२१,८५५

  • इतरांना गेलेली एकूण मते - २४६८

सुनेत्रा पवार विजयाच्या दिशेने

  • एकूण झालेले मतदन - ८८३९

  • सुनेत्रा पवार यांना झालेले मतदान - ८५५९

  • इतर मते - २८०

  • १३ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना झालेले एकूण मतदान - १,१२,२६८

  • इतरांना गेलेली एकूण मते - २२७३

बारावी फेरी पुर्ण

  • एकूण झालेले मतदान - ८२००

  • सुनेत्रा पवार यांना झालेले मतदान - ८०५७

  • इतर मते - १४३

  • इतरांना गेलेली एकूण मते - १९९३

  • सुनेत्रा पवार १,०३,७०९ मतांनी आघाडीवर

अकरावी फेरी पुर्ण; 95,552 मतांनी सुनेत्रा पवार आघाडीवर

  • एकूण झालेले मतदन - ८०७२

  • सुनेत्रा पवार यांना झालेले मतदान - ७९२४

  • इतर मते - १४८

  • ११ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना झालेले एकूण मतदान - ९५,५५२

  • इतरांना गेलेली एकूण मते - १८५०

१० व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार आघाडीवर

  • एकूण झालेले मतदान - ९,४७७

  • सुनेत्रा पवार यांना झालेले मतदान - ९,२००

  • इतर मते - २७७

  • सुनेत्रा पवार यांना झालेले एकूण मतदान - ८७,७२८

  • इतरांना गेलेली एकूण मते - १,७०२

बारामतीत आठ फेऱ्या पुर्ण

  • एकूण झालेले मतदान - 8831

  • सुनेत्रा पवार यांना झालेले मतदान - 8725

  • इतर मते - 106

  • 8व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना झालेले एकूण मतदान - 70,642

सातव्या फेरीत देखील सुनेत्रा पवार आघाडीवर 

सात फेरी पुर्ण झाल्या नंतर सुनेत्रा पवारांना 61,917 मतं

बारामतीत सहा फेऱ्या पुर्ण

सुनेत्रा पवारांना 54,504 मतं

बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला येथील एमआयडीसीतील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सोमवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. पहिल्यापासूनच महायुतीच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार या मोठ्या मताधिक्याकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

बारामती पोटनिवडणूकीसाठी ५७.१७ टक्के मतदान झाले होते. सध्या मतमोजणीतील कल लक्षात घेता सुनेत्रा पवार यांना एकूण मतदानाच्या सुमारे ९८.५० टक्के मते मिळताना दिसून येत आहे. अन्य २२ अपक्ष व नोटा यांना अवघे १.५ टक्के मतदान जाताना दिसत आहे. एकूणच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत सुनेत्रा पवार या मोठ्या मताधिक्याने विजयी होत असल्याची स्थिती आहे.

मतमोजणीचा कल लक्षात घेता त्या देशात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम प्रस्थापित करू शकतात, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे अन्य २२ अपक्षांपैकी बहुतांश जणांचे प्रतिनिधी सुद्धा मतमोजणीला उपस्थित राहिलेले नाहीत. काही स्थानिक अपक्षच येथे उपस्थित आहेत. परंतु पवार यांचा मोठा विजय होणार हे लक्षात घेत ते ही आता केंद्राबाहेर पडू लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT