पुणे

पुणे : बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. केतन कोठावळे

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अ‍ॅड. केतन कोठावळे यांनी अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत निर्विवाद वर्चस्व राखत विजत मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेद्वार अ‍ॅड. राहुल दिंडोकर यांचा 1 हजार 230 मतांनी पराभव केला. कोठावळे यांना 2 हजार 728 मते मिळाली. असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत अ‍ॅड. विश्वजीत पाटील यांना 3 हजार 10 तर अ‍ॅड. जयश्री चौधरी-बीडकर 2 हजार 234 मते मिळाली.

सचिवपदासाठी अ‍ॅड. राहुल कदम यांना 2 हजार 719 व अ‍ॅड. गंधर्व कवडे यांना 2 हजार 491 मते मिळाली. तर, खजिनदारपदासाठी 2 हजार 791 मते मिळवून अ‍ॅड. समीर बेलदरे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. आडिटर म्हणून अ‍ॅड. अजय देवकर यांची तसेच कार्यकारिणी सदस्यपदी अ‍ॅड. अमोल वडगणे, ऍड. प्रमोद नढे, ऍड. मयुरी कासट, ऍड. संजय खैरे, ऍड. रेश्‍मा चौधरी, ऍड. श्रध्दा जगताप, ऍड. राहुल प्रभुणे, ऍड. ऋषिकेश कोळपकर, ऍड, चंद्रसेन कुमकर आणि ऍड. सचिन माने यांची यापुर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूकीसाठी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अमित गिरमे यांनी कामकाज पाहिले. तर उप निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. दिलीप जगताप, ॲड. माधवी पोतदार, ॲड. शरद कुलकर्णी, ॲड. कांताराम नप्ते आणि ॲड. सिद्धेश्वर चौधरी यांनी कामकाज पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT