पुणे : पुढारी वृत्तसेवा : आर्थिक वर्ष संपण्यासाठी सव्वा महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने अंदाजपत्रकात दिलेले मिळकतकराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून मिळकत करवसुलीसाठी पथके तयार करण्यात आली असून, आजपासून (गुरुवार) धडक कारवाई सुरू केली जाणार आहे. तर, उद्यापासून थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजविला जाणार आहे. करआकारणी व करसंकलन हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी या विभागाला 2 हजार 318 कोटी उद्दिष्ट देण्यात आले.
या उद्दिष्टपूर्ततेसाठी करआकारणी व करसंकलन कार्यालयाकडून थकबाकीच्या वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली. यानुसार मिळकतजप्तीची कारवाई देखील केली जाणार असल्याचे करआकारणी व करसंकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले. तसेच, थकबाकीदारांच्या घरासमोर बँड बाजविला जाणार आहे. दरम्यान, नागरिकांना मिळकतकर भरता यावा, यासाठी नागरी सुविधा केंद्रे सर्व शासकीय सुटीच्या दिवशी व शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत, तर रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत खुली असतील. त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीनेही मिळकतकर भरता येईल.
हेही वाचा