पुणे

तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे बांबूची लागवड सुरू

अमृता चौगुले

तळेगाव दाभाडे; पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील असलेल्या मंत्रासिटी ते घोरावाडी स्टेशन या ओढ्यालगत 'माझी वसुंधरा अभियाना'अंतर्गत बांबू या प्रजातीच्या वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आयोजन उद्यान पर्यवेक्षक सिद्धेश्वर महाजन, मिळकत व्यवस्थापक जयंत मदने फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक महेश महाजन व फ्रेंड्स ऑफ नेचर चे सदस्य व बांबू वृक्षाबाबत विशेष अभ्यास असलेले डॉ. हेमंत बेडेकर यांचेकडून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या अभियानाअंतर्गत नगर परिषदेमार्फत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यास अनुसरून तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील असलेल्या मंत्रासिटी ते घोरावाडी स्टेशन या ओढ्यालगत टप्प्याटप्प्याने बांबू या प्रजातीच्या 3000 वृक्षांची लागवड टप्प्याटप्प्याने करण्यात आली आहे.

या ओढ्यातील प्लास्टिक आणि कचरा उचलणेसाठी व ओढ्याची स्वच्छता करण्यासाठी नगर परिषदेमार्फत 5 लोकांचे पथक (दि.15) पासून नेमण्यात आलेले आहे. या ओढ्याची स्वच्छता टिकवने व बांबू या प्रजातीच्या वृक्षलागवडीचा उद्देश ओढ्याच्या पाण्याचा पोत सुधारण्यासाठी तसेच पाण्याची गुणवत्ता वाढविणे तसेच ओढ्याचे स्खलन थांबविणे हा आहे.

वृक्षलागवडसाठी सहकार्य करा : सरनाईक
या अभियानातील वृक्षलागवड हा एक महत्त्वाचा घटक असून, या उपक्रमादरम्यान शहरातील नागरिकांनीही जास्तीतजास्त वृक्षलागवड करून अभियानात सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT