खोर: खोर (ता. दौंड) परिसरात या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. परिणामी, तब्बल तीन वर्षांनंतर बाजरीचे पीक खोरच्या परिसरात जोमात डौलाने फुलू लागले आहे.विशेषतः बाजरीच्या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असून, तीन वर्षांच्या खंडानंतर या भागात बाजरीची शेती पुन्हा एकदा हिरवाईने बहरली आहेत.
या हंगामात सुमारे 100 हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली आहे. दर्जेदार बियाणे, योग्य वेळी झालेला पाऊस आणि शेतकर्यांचा कष्टाळूपणा यामुळे पिकाची वाढ जोमात होत असून, तणावमुक्त पिकांची स्थिती पाहून शेतकरी समाधानी आहेत. (Latest Pune News)
एकरी सरासरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळण्याचा अंदाज कृषितज्ज्ञांनी वर्तवला आहे. मागील काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने किंवा अनियमिततेमुळे बाजरीचे पीक अपेक्षित प्रमाणात आले नव्हते; मात्र यंदा पावसाने साथ दिल्याने पिकांच्या मुळांपासून ते शेंड्यांपर्यंत ताजेतवाने वाढ होत आहे. स्थानिक शेतकरी सांगतात की, गेल्या तीन वर्षांत बाजरीची पेरणी केली असली तरी हवामान साथ देत नव्हते.
यंदा मात्र वेळेवर पाऊस आला आणि पिकाच्या वाढीला चांगली गती मिळाली. पुढील काळात हवामान अनुकूल राहिले तर उत्पादन विक्रमी होईल. खोर परिसरातील हिरवीगार शेते, वार्यावर डुलणार्या बाजरीच्या कणसांचा सुवास आणि शेतकर्यांच्या चेहर्यावरील समाधान पाहता खरिपाचा हंगाम यंदा निश्चितच समृद्धी घेऊन येणार, असा विश्वास व्यक्त केला जात आह