पुणे

फुरसुंगी : बेबी कॅनॉलमध्ये जलपर्णी फोफावल्यामुळे दुर्गंधी

अमृता चौगुले

फुरसुंगी; पुढारी वृत्तसेवा : मुंढवा जॅकवेलचे पाणी नदीपात्रातून बेबी कॅनॉलमध्ये सोडले जात आहे. परिणामी, या कालव्यात जलपर्णी वाढल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा उच्छादही वाढला आहे. यामुळे ही जलपर्णी काढण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे व नागरिकांनी केली आहे.

मुळा, मुठा नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. स्पायडर मशीनने जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेने ठेकेदाराला दिले आहे. यामुळे ही जलपर्णी आता मुंढवा जॅकवेलमधून बेबी कॅनॉलमध्ये येत असल्याने या ठिकाणी सर्वत्र जलपर्णी फोफावली आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांची उत्पत्ती मोठ्या संख्येने झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेने या कालव्यातील जलपर्णी तातडीने काढावी, डासांना प्रतिबंध करण्यासाठी औषध फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे.

SCROLL FOR NEXT