पुणे

वडगाव बुद्रुक येथील जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

अमृता चौगुले

धायरी; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील कालव्यालगत असलेल्या जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. यामुळे या ठिकाणी येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत असून, याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक ते वडगाव फाट्यापर्यंत हा जॉगिंग ट्रॅक आहे. पेव्हिंग ब्लॉक उखडल्याने ट्रॅकचा अर्धा भाग निकामी झाला आहे.

कालव्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे व गवत वाढले आहे. तसेच संरक्षक जाळ्याही तुटल्या आहेत. या ट्रॅकवर सकाळी व सायंकाळी चालण्यासाठी नागरिक येतात. परंतु, या ट्रॅकची दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड म्हणाले की, या ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी मुख्य खात्याकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर त्वरित दुरुस्तीची कामे सुरू करण्यात येतील.

कालव्यालगत असलेल्या जॉगिंग ट्रॅकचे पेव्हिंग ब्लॉक उखडल्याने दुरवस्था झाली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर दुरुस्तीचे काम होणे गरजेचे आहे.

                                गणेश कुलथे, रहिवासी, वडगाव बुद्रुक

SCROLL FOR NEXT