पिंपरी : शहरात गेल्या आठ महिन्यांमध्ये 1 हजार 289 अर्थात या सरासरीने प्रतिदिन पाच परदेशी नागरिक येत असल्याची माहिती पोलिसांच्या नोंदीवरून पुढे आली आहे. यामध्ये शिक्षण, नोकरी, वैद्यकीय सुविधा, व्यवसाय अशा निमित्ताने ते शहरात येतात.
पिंपरी-चिंचवड शहरात आहे. शिक्षणाच्या अनेक संधी असल्याकारणाने शिक्षणासाठी आलेल्या परदेशी नागरिकांची संख्या वाढत आहे. तसेच आयटीहबमुळे नोकरीसाठी परदेशातून येणार्यांची संख्यादेखील वाढू लागली आहे.
परदेशातील नागरिक शहरात वास्तव्य करीत असताना, त्यांना चोवीस तासाच्या आत सर्व प्रथम ऑनलाईनद्वारे सी फॉर्म भरणे आवश्यक आहे. यामध्ये परदेशी नागरिकांना शहरात वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणाचा उल्लेख करावा लागतो. त्यासोबतच शहरात कुठल्या हेतुसाठी किती कालावधीपर्यंत राहणार आहेत. त्याबाबतचा संपूर्ण तपशील भरावा लागतो.
शिक्षणासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना शहरात कमाल पाच वर्षे राहण्याची मुभा असते. त्यानंतर त्यांना परत स्वदेशात जाऊन मुदतवाढ घ्यावी लागते. मुदतवाढ न घेता राहणे बेकायदा आहे.
दीर्घ मुदतीच्या व्हिसासाठी म्हणजे 180 दिवसांहून अधिक दिवस देशात मुक्काम करायचा असल्यास त्यांना आयुक्तालयातील एफआरओ अधिकार्यांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
1 जाने ते 30 ऑगस्ट 2023
देश नागरिक
ईरान ः 64
अफगाण ः 77
चीन ः 65
येमेन ः 41
ईराक ः 26
कोमोरोज ः 14
बांग्लादेश ः 46
देश नागरिक
नायजेरिया ः 18
चाड ः 5
काँगो ः 2
ऑस्ट्रेलिया ः 11
कोरिया ः 267
इतर देश ः 553
एकूण ः 1289
हेही वाचा