पुणे

पिंपरी : आंध्र प्रदेशातील कडीपत्ता बाजारात

अमृता चौगुले

पिंपरी : राज्यात वाढलेल्या थंडीमुळे कडीपत्त्याची आवक घटली आहे. त्याचा परिणामी पुरवठ्यावर होत आहे. सध्या कडीपत्त्यास मागणी वाढल्याने शहरातील भाजी मंडईत आंध्र प्रदेशातून कडीपत्ता आणला जात आहे. नागरिकांच्या आहारात आता कडीपत्त्याचे स्थान वाढले आहे; तसेच देशाच्या दक्षिण भागातील लोकांचे वास्तव्य शहरात मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांच्या प्रत्येक आहारात कडीपत्त्याचा वापर केला जातो.

त्यामुळे ग्राहकांकडून बाजारपेठात कडीपत्त्याची मागणी होते; मात्र थंडीमुळे या पिकाचे उत्पादन राज्यांमधून घेण्यास विलंब होत आहे. याउलट आंध्र प्रदेशातील वातावरण वर्षभर इतर राज्यांपेक्षा दमट आणि उष्ण असल्याने या राज्यामधून कडीपत्त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

SCROLL FOR NEXT