पुणे

तळेगाव येथे वाहतूक पोलीस विभागाने बुजविले खड्डे

अमृता चौगुले

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडेस्टेशन चौकात कायम स्वरुपी असलेले खड्डे पावसामुळे आणि वाहतूकीमुळे आणखी मोठे झालेले आहेत. त्यामध्ये अधून मधुन पाणी साचत आहे. यामुळे वाहन चालकांना आणि पायी चालणा-यांना खड्डयाचा अंदाज येत नाही. तेथे मुंबईच्या दिशेने जाणा-या आणि येणा-या वाहनांचे प्रमाण मोठे आहे. तसेच नागरिकांचीही तेथे वर्दळ असते. सदर खड्डे बुजविण्याकरिता पीडब्ल्यूडी वडगाव तसेच नगरपरिषद तळेगाव दाभाडे यांच्याशी तळेगाव वाहतूक पोलीस शाखेने संपर्क साधलेला आहे.

परंतु कायम स्वरुपी खड्डे बुजविणे बाबत दुर्लक्ष होताना दिसुन येत आहे. यापुर्वी तेथे अनेकवेळा अपघात झालेले आहेत. भविष्यात अपघात होऊन जिवीतहानी होउ नये यासाठी तात्काळ उपयोजना म्हणून तळेगाव वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने सदरचे खड्डे आरएमसी मटेरियल द्वारे तात्पुरत्या स्वरूपात तळेगाव वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल यांचे सुचने नुसार बुजवून घेतले आहेत.

SCROLL FOR NEXT