पुणे

ललित पाटील, भूषण पाटीलला मेफेड्रोनचा फॉर्मुला देणारा अरविंद लोहारे पुणे पोलिसांच्या ताब्यात

backup backup

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग्स तस्कर ललित पाटील, भूषण पाटील यांना मेफेड्रोनचा फॉर्मुला देणारा अरविंद लोहारे याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोहारे याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यामुळे या प्रकरणात अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहारे (रा. ओशिवरा, मुंबई) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अरविंदकुमार लोहारे हा केमिकल इंजिनियर आहे. अरविंद लोहारे हा चाकण येथील ड्रग्स प्रकरणात २०२० पासून येरवडा जेल मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. येरवडा जेल मध्ये अरविंद लोहारे यांची ललित पाटीलशी ओळख झाली.लोहारे हा केमिकल इंजिनीअर असून मेफेड्रोन बनविण्यात माहीर आहे. लोहारे याने ही गोष्ट ललित पाटील याला जेल मध्ये सांगितली. यानंतर लोहारे याने ललित पाटील याला मेफेड्रोन बनविण्याचा फार्मुला सांगितला. तसेच अरविंद लोहारे याच्या सांगण्यावरून हरीश पंत याने भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेची भेट घेतली. शिवाजी शिंदे राहुल पंडित आणि इतर साथीदारांच्या मदतीने नाशिक येथील शिंदे गावात मेफेड्रोन तयार करण्याची कारखाना सुरु केला होता. याप्रकरणी आता पर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

लोहारे याने अनेकांना मेफेड्रोन बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. मेफेड्रोन कसे तयार करायचे हे शिकावण्यासाठी लोहारे याने ३५ लाख रुपये घेतले होते. लोहारे याच्यावर नाशिक आणि इगतपुरी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत.

SCROLL FOR NEXT