पुणे

चाकण मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली

अमृता चौगुले

चाकण; पुढारी वृत्तसेवा : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी (दि. 1) कांद्याच्या आवकेत अचानक मोठी घसरण झाली. शनिवारी फक्त 10 हजार 500 पिशवी कांद्याची आवक होऊन कांद्याला 600 ते 900 रुपये एवढा भाव मिळाला. दोनच दिवसांपूर्वी चाकण मार्केटमध्ये तब्बल 1 लाख पिशवी (50 हजार क्विंटल) आवक झाली होती. त्यातुलनेत ही आवक नगण्य मानली जात आहे.

1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री करणार्‍या एका शेतकर्‍याला 200 क्विंटल कांद्यासाठी अनुदान देण्यात येणार असल्याचे धोरण शासनाने ठरविल्याने त्यापूर्वी कांदा मार्केटमधून आणून विक्री करण्यात आला. खूप मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादकांनी 31 मार्चपूर्वीच कांद्याची मार्केटमध्ये विक्री केली. त्यामुळे कांद्याच्या आवकेत परिणाम झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

दरम्यान, खूप मोठ्या प्रमाणावर दोन दिवसांपूर्वी चाकण मार्केटमध्ये आलेला कांदा अद्यापही तसाच पडून आहे. मोठे खरेदीदार व्यापारी मार्केटकडे फिरकले नसल्याचे अडत्यांचे म्हणणे आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत वाढ करून त्यानंतर देखील कांदा मार्केटमध्ये विक्री करणार्‍या उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली आहे.

SCROLL FOR NEXT